Headlines

आंबोली – चौकुळ रस्त्याचे निकृष्ट काम पुन्हा करा…

कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्या ठेकेदाराला सुचना ⚡सावंतवाडी ता.१९-; आंबोली चौकुळ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुनश्च करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांनी ठेकेदाराला केल्या आहेत. सदरचे काम निकृष्ट होत असल्याने तेथील ग्रामस्थांनी ते बंद पाडले होते आज स्वतः त्या ठिकाणी सौ चव्हाण यांनी भेट देऊन कामाचे पाहणी केली. आंबोली…

Read More

राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड झालेल्या रोशन सावंत यांचा सत्कार

मनसे सरचिटणीस संदीप दळवी, महेश परब यांनी दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातील ओवळीये गावातून राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या रोशन सावंत यांचा मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सरचिटणीस श्री दळवी यांनी ग्वाही दिले. महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More

चौगुलेश्वर संघ गाबीत समाज क्रिकेट स्पर्धेत विजेता

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-गाबीत समाज वेंगुर्लेतर्फे गाबीत समाज मर्यादीत, वेंगुर्ले कॅम्प सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे आयोजित केलेल्या दोन दिवशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शिरोडा केरवाडीच्या चौगुलेश्वर क्रिकेट संघाने प्रतिसर्धी सन्मुख उमादांडा-मुठ संघास यावात रोखून धरत १५ धावांनी विजेता ठरला. प्रथम क्रमांकाचा तालुकास्तरीय गाबीत चषक व रोख रू ११,१११ चे पारीतोषिक पटकाविले. तर सन्मुख उमादांडा-मूठ संघाला उपविजेते पदावर…

Read More

सावंतवाडी शाळा क्रमांक ६च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत यश

नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार ⚡सावंतवाडी ता.१९-: (कै.)श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा नं ६ भटवाडी सावंतवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवल्याबद्दल नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेत तिसरीच्या विद्यार्थी प्रथमेश लांबर हा 178 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत…

Read More

कनेडी राडाप्रकरणी आम. वैभव नाईक, सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील कनेडी येथे झालेल्या राड्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल असलेल्या आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी मंजूर…

Read More

युवा जादुगार कला गौरव पुरस्कार प्राप्त जादुगार केतनकुमार यांचा मनसेतर्फे सत्कार

⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र युवा कला गौरव २०२२ उत्कृष्ट युवा जादूगार पुरस्कार प्राप्त युवा जादुगार केतनकुमार उर्फ केतन सावंत याचा आज मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी आणि महेश परब यांच्या हस्ते सावंतवाडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सावंतवाडी मनसे पदाधिकार, मनसैनिक उपस्थित होते. केतन सावंत यांनी पदाधिकारी मनसैनिकाचे आभार व्यक्त केले.

Read More

पाणी जपून वापरा;अपव्यय टाळा

मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.१९-: एल निनो च्या प्रभावामुळे राज्यात यावर्षी पावसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाई निवारण करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे आवाहन नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे. त्यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले असून त्यात असे म्हटले की, एल निनो च्या प्रभावामुळे यावर्षी पावसावर विपरीत परिणाम होणार…

Read More

आठवडा बाजाराबाबत अण्णा केसरकरांकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

शहरातील जागा सुचविल्या ; कार्यवाही करण्याची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: शहरातील भाजी मार्केट आठवडा बाजार नव्याने भरवण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शहरातील काही जागा सुचवल्या असून त्याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासक यांना दिले आहे आपण दिलेल्या जागेचा विचार केल्यास मोती तलावाची शोभा बाधित न होता व्यापारी वर्गाला सुद्धा फायदा होईल…

Read More

कै.ॲड. दिपक नेवगी स्मृती पुरस्काराने ॲड. सुभाष पणदुरकर यांचा गौरव…

⚡सावंतवाडी ता.१९-: श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी व कै.अँड.दिपक नेवगी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा कै.अँड.दिपक नेवगी स्मृती पहिला पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ विधिज्ञ अँड.सुभाष तथा आबासाहेब पणदुरकर यांना प्रदान करण्यात आला. अँड.सुभाष पणदूरकर यांच्या विविध क्षेत्रातील बहुमूल्य कार्याची दखल घेऊन प्रा. दत्ता पाटील, गडहिंग्लज यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल -श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.या वेळी…

Read More

इस्वटी महापुरुष मंदिराचा २२ रोजी प्रथम वर्धापनदिन

⚡सावंतवाडी ता.१९-: शहरातील सबनीसवाडा भागातील ऐतिहासीक व संस्थानकालीन जागृत श्री देव इस्वटी महापुरुष मंदिराचा प्रथम वर्धापनदिन शनिवारी २२ एप्रिल रोजी साजरा होत असून, यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ६:३० ते ८:३० पर्यंत चरण पादुका प्रतिष्ठापना, सकाळी ९:३० वाजता पालखी मिरवणूक सोहळा त्यानंतर होम हवन, दुपारी १ वाजता…

Read More
You cannot copy content of this page