⚡सावंतवाडी ता.१९-: शहरातील सबनीसवाडा भागातील ऐतिहासीक व संस्थानकालीन जागृत श्री देव इस्वटी महापुरुष मंदिराचा प्रथम वर्धापनदिन शनिवारी २२ एप्रिल रोजी साजरा होत असून, यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी ६:३० ते ८:३० पर्यंत चरण पादुका प्रतिष्ठापना, सकाळी ९:३० वाजता पालखी मिरवणूक सोहळा त्यानंतर होम हवन, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजन तर रात्री ९ वाजता माऊली दशावतारी नाटयमंडळ इन्सुली यांचा “माया प्रलय” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
