हडी येथे २ व ३ रोजी मूळपुरुष मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

⚡मालवण ता.१९-: हडी येथील मेतर, लोणे, मेथर व कालमेथर कुटुंबियांच्या मूळपुरुष मंदिर आणि पाषाणमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा दि. २ व ३ मे रोजी होणार आहे.

यनिमित्त २ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरापासून ते मूळपुरुष मंदिरापर्यंत मिरवणुकीने आगमन, दुपारी पाषाण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, ३ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, भजन व दुपारी महाप्रसाद होणार आहे. मेतर, लोणे, मेथर व कालमेथर कुटुंबातील बंधू भगिनी व भाविकांनी उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी देविदास कालमेथर (९४०३३६८५९१) यांच्याशी संपर्क साधावा, आवाहन मेतर, लोणे, मेथर व कालमेथर परिवारांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page