देवबाग येथे २२ पासून ध्यानयोग व्हिडीओ शिबीर

⚡मालवण ता.१९-: श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनतर्फे दि. २२ ते २९ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत देवबाग येथील विठ्ठल मंदिरा नजीक तोरसकर आणि गोसावी परिवार येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग व्हिडीओ शिबीर आयोजित करण्यात आले आहे. समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांनी ध्यानयोगावर जी प्रवचने केली ती या शिबिरात व्हिडीओद्वारे प्रसारित होणार आहेत.

ध्यानयोगाचे महत्व, फायदे याबाबत या शिबिरात मार्गदर्शन होणार आहे. हे शिबीर मोफत असून इच्छुकांनी सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी निखिल धुरी (८८५०२३९३९९), वंशिता सारंग (८९७६३६९२६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिबीर संचालक हिमालयीन समर्पण ध्यानयोग केंद्र, मुलुंड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page