देवबाग पंढरीनाथ देवालयात २२ पासून कार्यक्रम

⚡मालवण ता.१९-: श्री देव पंढरीनाथ ग्रामस्थ मंडळ, देवबाग यांच्यावतीने श्री देव पंढरीनाथ देवालय येथे दि. २२ ते २८ एप्रिल या कालावधीत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी भागवत संहिता पारायण व सायंकाळी प्रवचन (निरुपण) व त्या अनुषंगाने पूर्वांग, उत्तरांग, होम, हवन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.

या भागवत सप्ताहात प्रसिद्ध प्रवचनकार रागवेंद्र बुवा देशपांडे (रामदासी) व प्रसिद्ध संहिता वाचनकार पांडुरंग करंबळेकर हे प्रवचन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन पंढरीनाथ ग्रामस्थ मंडळ देवबाग-मोबार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page