कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्या ठेकेदाराला सुचना
⚡सावंतवाडी ता.१९-; आंबोली चौकुळ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुनश्च करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांनी ठेकेदाराला केल्या आहेत. सदरचे काम निकृष्ट होत असल्याने तेथील ग्रामस्थांनी ते बंद पाडले होते आज स्वतः त्या ठिकाणी सौ चव्हाण यांनी भेट देऊन कामाचे पाहणी केली.
आंबोली चौकुळ या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल 1 कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे काम ठेकेदार दिलीप नार्वेकर यांच्याकडून करण्यात येत होते मात्र हे काम सुमार दर्जाचे होत असल्याने तसेच डांबराचा वापर कमी होत असल्याने ग्रामस्थांनी ते बंद पाडले होते जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम च्या कार्यकारी अभियंता सौ चव्हाण या घटनास्थळी येऊन कामाची पाहणी करत नाही तोपर्यंत सदरचे काम सुरू करण्यास देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेत कामाची तक्रार कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्याकडे केली होती.
दरम्यान आज चव्हाण यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता खरोखरच काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे तब्बल पाचशे मीटर चे काम पुनश्च करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदार श्री नार्वेकर यांना दिल्या शिवाय निकृष्ट काम स्वतः उपस्थित राहून काढून घेतले यावेळी तुकाराम गावडे,पांडू चव्हाण व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत कार्यकारी अभियंता सौ.चव्हाण यांना विचारले असता त्या म्हणाल्या आंबोली चौकुळ रस्त्याचे काम गेले काही दिवस सुरू आहे या रस्त्यासाठी तब्बल 1 कोटी 75 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे दरम्यान ठेकेदाराकडून हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता व काम बंद पडले होते आज स्वतः कामाच्या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यासह भेट देऊन पाहणी केली असता सदरचे काम निकृष्ट दिसून आले त्यामुळे रस्त्याचे काम पुनश्च करण्याच्या सूचना करण्यात आले आहे.
