ओरोस येथे मोफत करिअर मार्गदर्शन

⚡वेंगुर्ला ता.१९-: कुडाळ-आदर्शनगर व कै.सौ.रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्ट सिद्धार्थनगर-मठ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व धर्मिय व सर्व जातीतील इयत्ता आठवी ते पदवीधर तसेच पदव्युत्तर युवक व युवतींच्या भविष्यातील वाटचालीसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.

  हे शिबिर २३ एप्रिल रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिधुदुर्ग-ओरोस येथे होणार आहे. तत्पूर्वी याच ठिकाणी सकाळी १०.३० ते १ पर्यंत जयंती साजरी केली जाणार आहे.  या शिबिरात सहभागी होण्या-यांनी आपली नावे संजय खोटलेकर (९४२३८७८६३६) किवा एन.पी.मठकर (९४२१२६७८६६) यांच्याकडे नोंदवावीत.
You cannot copy content of this page