पाणी जपून वापरा;अपव्यय टाळा

मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे आवाहन…

⚡सावंतवाडी ता.१९-: एल निनो च्या प्रभावामुळे राज्यात यावर्षी पावसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाई निवारण करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे आवाहन नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.

त्यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले असून त्यात असे म्हटले की, एल निनो च्या प्रभावामुळे यावर्षी पावसावर विपरीत परिणाम होणार आहे एकूणच कमी पाऊस झाल्यास पाणीटंचाई होणार आहे यासाठी शहरातील नळ धारकांनी पाण्याचा वापर करताना पाण्याचा अपव्यय टाळावा नळ कनेक्शन वर गळती असल्यास ते त्वरित दुरुस्त करावी सद्यस्थितीत काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी याबाबत शहरातील नागरिकांनी नगरपालिकेत सहकार्य करावे कोणत्याही न धारकाने नळ कनेक्शनच्या डायरेक्ट पाईपलाईन ला पंप जोडून पाणी घेऊ नये सदर बाबत पाहणी करण्यासाठी नगरपरिषदेकडून फिरते पथक नेमण्यात आले आहे असा प्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

You cannot copy content of this page