वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
गाबीत समाज वेंगुर्लेतर्फे गाबीत समाज मर्यादीत, वेंगुर्ले कॅम्प सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे आयोजित केलेल्या दोन दिवशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शिरोडा केरवाडीच्या चौगुलेश्वर क्रिकेट संघाने प्रतिसर्धी सन्मुख उमादांडा-मुठ संघास यावात रोखून धरत १५ धावांनी विजेता ठरला. प्रथम क्रमांकाचा तालुकास्तरीय गाबीत चषक व रोख रू ११,१११ चे पारीतोषिक पटकाविले. तर सन्मुख उमादांडा-मूठ संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. उपविजेते पदाचा चषक व रोख रु. ७७७७ चे बक्षिस त्यांनी मिळविले. या दोन्ही क्रिकेट संघांची मालवण-दांडी येथे दि २७ ते ३० एप्रिल होणाऱ्या गाबीत समाजाच्या महोत्सवात दि २४ एप्रिल रोजी होणाऱ्या मर्यादीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेंगुले कॅम्प सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे १५ व १६ एप्रिल या दोन दिवशी आयोजित केलेल्या गाबीत समाज मर्यादीत ६ षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट सर्धेचे उद्घाटन उद्योजक श्याम सारंग यांच्या हस्ते उदघाटन झाले. तर पहिल्या क्रिकेट सामन्यासाठी नाणेफेकचा शुभारंभ जेष्ठ मच्छिमार तथा बोट चालक-मालक संघाचे पदाधिकारी बाबी रेडकर यांच्या हस्ते झाले. गाबीत समाजाचे तालुक्यातील १४ संघ सहभागी झाले होते. सलग दोन दिवस चाललेल्या या सर्धेत अटीतटीचे सामने पार पडले.
यासदर स्पर्धा यशस्वीतेसाठी गाबीत समाज वेंगुर्लेच्या माजी प्राध्यापक बाबुराव खडपकर, सुधीर सारंग, आनंद बटा, श्वेता हुले, सगुण सातोस्कर, पिंटू धावडे, श्रीराम कांदळगांवकर, पिंटु कुबल, चंद्रकांत चोडणकर, अमित कुबल सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रथमच दोन दिवशीय स्पर्धात सहभागी झालेल्या खेळाडू व मान्यवार अतिथिंना दोन दिवस शाकाहारी व मच्छि जेवणाची व्यवस्था याच मैदान स्थळी करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन व आभाराचे काम संचिछमार नेते वसंत तांडेल यांनी काम पाहिले. स्पर्धेचा अंतिम सामना चौगुलेश्वर केरवाडा- शिरोडा व सन्मुख उभादांडा-मुठ या दोन संघात झाला. या सामन्यासाठीची नाणेफेक सन्मुख उभादांडा-मुठ संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चौगुलेश्वर केरवाडा-शिरोडा संघाच्या प्रकाश पेडणेकर याने दोन षटकारासह वैयक्तीक 18 घावासह संघाची धावसंख्या ३ गडी बाद ४६ वर नेली. तर सन्मुख उभादांडा-मुठ संघाच्या चैतन्य परब या गोलंदाजाने उत्कृष्ठ गोलंदाजी करीत चौगुलेश्वर संघाचा 9 जणांचा बळी घेत त्यांच्या घावा रोखल्या. चौगुलेश्वर केरवाडा-शिरोडा संघाचे ४६ धावांचे आव्हान स्विकारत प्रत्त्युतरादाखल खेळलेल्या सन्मुख मुठ उभादांडा संघास, केरवाडा संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ठ गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ३१ घावांवर रोखले त्यामुळे चौगुलेश्वर केरवाडा-शिरोडा संघ” १५ धावांनी विजेता ठरला
या दोन दिवशीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मालिकावरी राकेश सारंग (सन्मुख उमादांडा-मुठ), उत्कृष्ठ फलंदाज दिपू गिरप (सन्मुख उभादांडा-मुठ), उत्कृष्ठ गोलदांज चैतन्य परब (चौगुलेश्वर केरवाडा-शिरोडा) आदींनी बभिसे यांनी पटकाविली.
या स्पर्धेचा बक्षिस व चषक वितरण सोहळा वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा गाबीत समाज वेंगुर्लचे अध्यक्ष दिलीप गिरप व माजी दुकाने संस्था निरीक्षक तथा गाबीत समाज वेंगुर्ले संस्थेचे सचिव किरण कुबल यांचे हस्ते झाले. तसेच इ बशिस व चषक याचे वितरण यावेळी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांतील नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, मच्छिमार नेते बाबी रेहकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर ट्रॉलर्स व्यावसायिक भाई मालवणकर, जेष्ठ मच्छिमार संभाजी येरागी, बाळू वस्तु, जयंत मोडकर, अनंत उर्फ दादा केळूसकर, सदानंद गिरप, वसंत तांडेल, किरण तोरस्कर, सूर्यकांत सागवेकर, नागेश गांवकर, सतीश हुले, विजय तांडेल, अर्जुन गिरप सुधीर नार्वेकर, उध्दव उगवेकर यांचे हस्ते झाले.
या स्पर्धेसाठी समालोचनाचे काम राजा परब, बेदांत परब, गुण लेखनाचे काम निलेश परब, स्वच्छतादुत संजय टेमकर स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनिल नाईक, अजित कानडे, बाबु टेमकर यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी गाबीत समाज वेंगुर्लेच्या माजी प्राध्यापक बाबुराव खडपकर, सुधीर सारंग, आनंद बटा, श्वेता हुले, सगुण सातोस्कर, पिंटू धावडे, श्रीराम कांदळगांवकर, पिंटु कुबल, चंद्रकांत चोडणकर, अमित कुबल सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रथमच दोन दिवशीय स्पर्धात सहभागी झालेल्या खेळाडू व मान्यवार अतिथिंना दोन दिवस शाकाहारी व मच्छि जेवणाची व्यवस्था याच मैदान स्थळी करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन व आभाराचे काम मच्छीमार नेते वसंत तांडेल यांनी काम पाहिले.
चौगुलेश्वर संघ गाबीत समाज क्रिकेट स्पर्धेत विजेता
