पेंडुर वेताळगडावरील विहिरीची दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता
⚡मालवण ता.०८-: पेंडुर येथील ऐतिहासिक वेताळगडावरील पुरातन विहीरवजा पाण्याच्या टाकीची दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या वेताळगडावरील विहीरवजा पाण्याच्या टाक्या झाडीझुडुपांनी गच्च झाल्या होत्या. आपला ऐतिहासिक वारसा जपण्याच्या हेतूने वेताळगडावरील मध्यावर असलेल्या एका विहिरीची स्वच्छता दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. स्वच्छता मोहिमेत गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे,…
