कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले
ऐन बाजारादिवशी एसटीच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार ⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून त्यातच कुडाळच्या बाजारादिवशी कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसून आले. यामुळे बाजारासाठी कुडाळ शहरात येणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सह्याद्रीच्या नजीक असलेल्या गावातून कुडाळमध्ये बाजाराला येणाऱ्या नागरिकांची संख्या आज जास्त होती. परंतु, कुडाळ एसटी आगारातून आज ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक…
