Headlines

विद्यामंदिर कणकवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम

⚡कणकवली ता.१७-: राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण सेना योजना व स्वच्छता विभाग यांच्यामार्फत दरवर्षी राबविला जाणारा वृक्षारोपण कार्यक्रम विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. बी. जाधव आणि प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात जांभूळ, काजू, आवळा, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हणाले की वृक्ष…

Read More

कणकवली अर्बन निधी लिमिटेड बँकेतर्फे २० ऑगस्ट रोजी वृक्षारोपण

⚡कणकवली ता.१७-: कणकवली अर्बन निधी लिमिटेड या बँकेच्या वतीने आयडियल इंग्लिश स्कूल अँड जुनीअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. रविवार २० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर ,हळवे कॉलेज दोडामार्गचे प्रा.डॉ.सुभाष उर्फ…

Read More

कणकवली नगरपंचायतीने काढली अमृत कलश यात्रा

माध्यमिक, महाविद्यालयातील विद्यार्थी झाले सहभागी ⚡कणकवली ता.१७-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोपांतर्गत देशभर ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियान राबविले जात आहे. यांतर्गत कणकवली नगरपंचायतीने गुरुवारी सकाळी पटकीदेवी ते आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत अमृत कलश यात्रा काढली. यात्रेत नगरपंचायतीचे वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे, लेखापाल प्रियांका सोंसुरकर , मनोज धुमाळे, सतीश कांबळे, प्रशांत राणे, प्रवीण गायकवाड, रवी महाडेश्वर, अमोल भोगले,…

Read More

शहीद जवान लक्ष्मण गवस यांना मानवंदना

तेरवणमध्ये स्वातंत्रदिनी कार्यक्रम,अनेकांची उपस्थिती ⚡दोडामार्ग,ता.१७-: भारत पाक युद्धात शहीद झालेले तेरवण गावचे सुपुत्र शहीद जवान लक्ष्मण गोपाळ गवस यांच्या गावात उभारलेल्या त्यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित व पूजाअर्चा करून पुष्पचक्र अर्पण केले आणिमानवंदना देण्यात आली. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझी माती माझा देश या केंद्र सरकारच्या अभियाना अंतर्गत १५ ऑगस्टलातेरवण शाळा नंबर १ येथे ध्वजारोहण व…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून शारदा विद्यालय मळगाव शाळेतील मुलांना वह्या वाटप

सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, भाजप मळगाव बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी यांच्या सहकार्याने वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर आणि माजी विद्यार्थी व भाजप मळगाव बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी यांच्या सहकार्याने मळगाव येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या वाटप…

Read More

आंबोलीत शिवसेनेतर्फे वाह्यावाटप

आंबोली,ता.१७ :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोलीत मुळवंदवाडी, सतीचीवाडी,जकातवाडी येथील प्राथमिक शाळेत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागअध्यक्ष बबन गावडे,उपसंघटक उत्तम पारधी,संतोष पाताडे,तळवडे चे प्रशांत बुगडे,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,प्रकाश गुरव,अनिल चव्हाण,शशीकांत सावंत,गौतमी पारधी, रविना गावडे,वासंती परब,शिक्षिका सुजिता येजरे,नारायण ऱ्हाटोळकर,नयना परब,अनिलकुमार चाळूचे,हौसा गवस,विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

तलाठी परीक्षा केंद्र दुसऱ्या टप्प्यातही बाहेरच्याच जिल्ह्यात

कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरीयांची टीका.. ⚡कुडाळ ता.१७-: तलाठी केंद्र दुसऱ्या टप्प्यात देखील बाहेरच्या जिल्ह्यात दिले गेले. मुख्य म्हणजे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार टीसीएस यांनी जिल्ह्यातील केंद्र देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एसएसपीएम या कॉलेजने तसेच एमआयटीएम कॉलेजने परीक्षेचे कारण देत परीक्षा केंद्र नाकारले. त्यामुळे केंद्रीय मंत्री…

Read More

शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक नार्वेकर यांचे स्नेहल जामदार यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक नार्वेकर यांचे मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगाव भाजप बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, शारदा विद्यालय मळगावच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या गौरवी मेस्त्री आदी उपस्थित होते.

Read More

शिरोडा नाका येथे कुत्रा आडवा आल्याने महिला जखमी…

राष्ट्रवादी शहराध्यक्ष अँड. राबिया शेख आगा यांची नगरपालिकेने उपाययोजना करण्याची मागणी ⚡सावंतवाडी ता.१७-: येथील शिरोडानाका सर्वेदयनगर येथील एका शाळे समोर कुत्रा आडवा आल्याने महिला किरकोळ जखमी झाली. ही घटना आज सकाळी घडले. दरम्यान जखमी महिलेला नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णाला दाखल केले. वारंवार भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत तात्काळ नगरपालिकेने यावर उपायोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला…

Read More

बांदा पोलीस ठाण्यातील होमगार्ड पथकाचा स्वातंत्र्यदिनी सत्कार…

२४ पर्यटकांची केली होती सुटका:मंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केला सन्मान.. बांदा/प्रतिनिधीघारपी (ता. सावंतवाडी) येथे मुसळधार पावसात धबधब्याखाली अडकलेल्या २४ पर्यटकांची सुखरूप सुटका केलेल्या बांदा पोलीस ठाण्यातील होमगार्ड पथकाचा स्वातंत्रदिनी ओरोस येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले. २३ जुलै रोजी सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. याचा फटका म्हापसा गोवा…

Read More
You cannot copy content of this page