सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, भाजप मळगाव बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी यांच्या सहकार्याने वाटप..
⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर आणि माजी विद्यार्थी व भाजप मळगाव बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी यांच्या सहकार्याने मळगाव येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आले.
शाळेतील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे वाटप करण्यात आले. या वाटपावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, भाजप मळगाव बूथअध्यक्ष विश्वनाथ गोसावी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या गौरवी मेस्त्रीआदी उपस्थित होते. या वाटपाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
