शहीद जवान लक्ष्मण गवस यांना मानवंदना

तेरवणमध्ये स्वातंत्रदिनी कार्यक्रम,अनेकांची उपस्थिती

⚡दोडामार्ग,ता.१७-: भारत पाक युद्धात शहीद झालेले तेरवण गावचे सुपुत्र शहीद जवान लक्ष्मण गोपाळ गवस यांच्या गावात उभारलेल्या त्यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित व पूजाअर्चा करून पुष्पचक्र अर्पण केले आणि
मानवंदना देण्यात आली.


देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझी माती माझा देश या केंद्र सरकारच्या अभियाना अंतर्गत १५ ऑगस्टला
तेरवण शाळा नंबर १ येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. शहीद जवान लक्ष्मण गवस यांना यावेळी
मानवंदना देण्यात आली. यावेळी वीर पत्नी भागिरथी लक्ष्मण गवस, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे लोकार्पण मे मध्ये शहीद होते. त्या कार्यक्रमाला पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊन सुद्धा ते उपस्थित न राहिल्याची खंत यावेळी व्यक्त केली. हेच का ते यांचे भारताविषयी व जवानांविषयीचे प्रेम असा प्रश्नही त्यांनी विचारला.

You cannot copy content of this page