कणकवली नगरपंचायतीने काढली अमृत कलश यात्रा

माध्यमिक, महाविद्यालयातील विद्यार्थी झाले सहभागी

⚡कणकवली ता.१७-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोपांतर्गत देशभर ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियान राबविले जात आहे. यांतर्गत कणकवली नगरपंचायतीने गुरुवारी सकाळी पटकीदेवी ते आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत अमृत कलश यात्रा काढली.

यात्रेत नगरपंचायतीचे वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे, लेखापाल प्रियांका सोंसुरकर , मनोज धुमाळे, सतीश कांबळे, प्रशांत राणे, प्रवीण गायकवाड, रवी महाडेश्वर, अमोल भोगले, संजय राणे, संदीप मुसळे, राजेश राणे, सचिन तांबे,रुचिता ताम्हाणेकर,निकिता पाटकर,
माधुरी डगरे,ध्वजा उचले
चिन्मय मुसळे,अस्मिता चव्हाण, जयश्री वणगे यांच्यासह न. पं. कर्मचारी बचत गटातील महिला विद्यामंदिर, कणकवली कॉलेज, एस. एम. हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page