नागोबाकडे भरला जातो ओवसा…
वेतोरे गावातील प्रथा आजही उत्साहात सुरु ⚡वेंगुर्ला ता.२१-: वेतोरे-सबनीसवाडी येथील गावडे कुटुंबियांची गेली पाच पिढ्यांपासून नागपंचमीच्या दिवशी नागोबाकडे ओवसा ओवासण्याची आगळी वेगळी प्रथा जोपासत आहेत. वेतोरे येथील गावडे कुटुंबियांबरोबर दापटीवाडी येथील मुळीक, आरावंदेकर कुटुंबिय व तालुक्यातील आसोली, जोसोली, वडखोल व होडावडेसह अन्य काही गावातही नागपंचमीच्या दिवशी नाबोबाकडे ओवसा ओवासण्याची परंपरा कायम आहे.
