⚡सावंतवाडी ता.२१-: क्रीडा संकुलन ओरोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेतील विद्यार्धी कु . शुभोमन संदिप सावंत (१४ वर्षांखालील मुलगे) याने प्रथम क्रमांक पटकावला.त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्याचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी कौतुक केले.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
