अन्यथा ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल;शहरप्रमुख शब्बीर मणियार यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२१-: शहराच्या बाजारपेठेत सावंतवाडी तालुक्याच्या आजूबाजूचे कुणकेरी, धवडकी,आंबोली,कलंबिस्त,सांगेली,कोलगाव,दापोली,आंबेगाव,मळगाव,इन्सुली,बांदा,मळेवाड,आरोंदा आदी भागातील गरिब शेतकरी व भाजी विक्रेत्या महिला आणी लोक येतात. मात्र सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी आणी कर्मचारी त्यांना शहरांमध्ये बसू देत नाहीत. त्यांना नाहक त्रास दिला जातोय. असा आरोप ठाकरे गटाचे शहरप्रमुख शब्बीर मणियार यांनी केला.दरम्यान या लोकांची होणारी परवड थांबून बसण्यास जागा उपलब्ध करावी. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील शब्बीर मणियार यांनी दिला आहे.
मनियार पुढे म्हणाले की नगरपालिका 40 ते 50 रुपये ची दर दिवसाला पावती करून पैसे घेतले जात आहेत. महागाई एवढी वाढली आहे की सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.ही गरीब लोक उन्हातानात बसतात.त्यामुळे त्यांची भाजी आणि विक्रीचे साहित्य उन्हात सुकून जाते. या लोकांना त्रास दिला जातोय.मात्र परप्रांतीय लोकांच्या एकाच व्यक्तीच्या पाच ते सात गाड्या सावंतवाडी लावल्या जातात.याकडे नगरपालिका ढुंकूनही बघत नाही. नगरपालिकेला याचं देणं घेणं नाही. सावंतवाडी नगरपालिकेने हे गावातून भाजी विक्रेते येतात त्यांना योग्य ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. आशी मागणी ही शब्बीर मणियार यांनी यावेळी केली आहे.तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाच्या वतीने नगरपालिकेला जशास तसे उत्तर दिले जाईल असे शब्बीर मणियार म्हणाले.
