प्रसाद कुबल:श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये जागतिक फोटोग्राफी दिन साजरा..
मालवण (प्रतिनिधी)
फोटोग्राफी हे तंत्रज्ञानाच्या आधारे सातत्याने विकसित होत गेलेले क्षेत्र आहे. फोटोग्राफी मध्येही ई कॉमर्स प्रॉडक्ट फोटोग्राफी, इव्हेन्ट्स, वाईल्ड लाईफ, फोटो जर्नालिझम अशा करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आज मोबाईलमुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड दिसून येते. आजचे विद्यार्थी भविष्यात फोटोग्राफी क्षेत्रातही अग्रेसर ठरू शकतील. विद्यार्थ्यांनी फोटोग्राफीकडे करियरच्या दृष्टिकोनातून पहावे, असे प्रतिपादन वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी केले.
वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये जागतिक फोटोग्राफी दिन साजरा झाला. विद्यार्थ्यांमध्ये फोटोग्राफीची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रशालेत ‘आठवणीतील क्षणचित्रे’ या नावाचे प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः कॅमेऱ्यात कैद केलेल्या फोटोंचे प्रदर्शन मांडले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्या फोटो मागील आपली आठवण देखील सांगितली. या प्रदर्शनामध्ये ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनादरम्यान उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्रथम – श्रावणी हडकर, द्वितीय- राहुल संदीप पालव, तृतीय- आर्यन पालव व उत्तेजनार्थ – श्रावणी महेश सावंत यांनी यश मिळविले. यासाठी परीक्षक म्हणून स्पमुख्याध्यापक प्रसाद कुबल आणि प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा केळुसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
