⚡कणकवली ता.२१-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित कणकवली तालुका क्रीडा परिषद च्यावतीने तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विद्या मंदिर प्रशाला कणकवली येथे पार पडल्या.
या स्पर्धा 14, 17, 19 वर्षाखालील मुले मुली अशा एकूण सहा गटात खेळण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , विद्यामंदिर प्रशाला कणकवलीचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे ,क्रीडा समन्वयक बयाजी बुराण ,श्री सातोसे,विषयतज्ञ सचिन तांबे , ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अच्युत वनवे यांच्या उपस्थितीत पार पडला. पंचप्रमुख म्हणून श्रीकृष्ण आडेलकर यांनी काम पाहिले. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम पाच खेळाडूंची कनेडी हायस्कूल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 14 वर्षाखालील मुले – 1) सुश्रुत मंदार नानल( आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) 2) वरद राजेंद्र तवटे (सेंट उर्सुला वरवडे) 3) यश प्रकाश काटकर( बी. एन. विजयकर ) 4) सात्विक विजय मालडकर (विद्यामंदिर प्रशाला कणकवली) 5) दर्शन अनंत पांचाळ (माध्यमिक विद्यामंदिर कासार्डे)
14 वर्षाखालील मुली 1) मुग्धा विकास साईल ( एसएम स्कूल कणकवली) 2) तनिष्का श्रीकृष्ण अडेलकर( विद्यामंदिर प्रशाला कणकवली) 3 सेजल सखाराम हुंबे (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट ) 4) निर्झरा सखाराम हुंबे (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) 5) देवयानी धनंजय कसवणकर (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल)
17 वर्षाखालील मुले 1) ध्रुव आनंद तेंडुलकर( विद्या मंदिर प्रशाला कणकवली) 2 आत्माराम दिलीप गव्हाणकर( कणकवली कॉलेज कणकवली) 3 गोविंद राजाराम बालेघाटकर( न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) 4 समर्थ संतोष पारकर( बी.एन. विजयकर ) 5 लक्षण विठ्ठल नांदगावकर (सरस्वती विद्यालय नांदगाव)
17 वर्षाखालील मुली 1 गायत्री विजयकुमार राठोड (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) 2 भार्गवी संजय गवस (एस एम एस स्कूल कणकवली) 3 साक्षी दयानंद गावकर (माध्यमिक विद्यालय नाटळ) 4 ततुजा संतोष चौकेकर( नाथ हायस्कूल करुळ) 5 मीनल भाग्योदय सुळेभावी (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल)
19 खालील मुले 1 गौरव किशोर कुडतरकर( कसार्डे हायस्कूल )2 रत्नेश राजेंद्र जातेकर( कणकवली कॉलेज ) 3 पार्थिव शैलेंद्र जाधव (कणकवली कॉलेज ) 4 विवेक रणजीत पाटील ( बी. एन. विजयकार) 5) स्वप्निल भाऊ जाधव (कनेडी कॉलेज)
19 वर्षाखालील मुली 1) समृद्धी संतोष खंदारे (कणकवली कॉलेज) 2 वैष्णवी राजाधवटे( कणकवली कॉलेज) 3) मदिरा वैभव काणेकर (आयडियल इंग्लिश स्कूल)
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सुधीर पेडणेकर, जयश्री कसालकर, मंदार , देटे ,सावळ , डांगे व इतर सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले.
