कुडाळात कार -दुचाकी भीषण अपघात…

एकाचा मृत्यू;तर अन्य एक जखमी;

कुडाळ, प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतनजीक आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली.

या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कुडाळ येथे नेण्यात आले. मात्र, दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी असून त्याला ओरोस येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा अपघात अनधिकृत मिडलकटमुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

You cannot copy content of this page