सिंधुदुर्गातील तरुणाईचा स्वर आश्वासक

गंधर्वतर्फे संगीततज्ञ कै. निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह

⚡कणकवली ता.२१-: कै निवृत्ती दाभोळे यांनी आपल्या स्वरसाधनेतून रसिकांच्या मनात उत्तुंग स्थान निर्माण केले. अनेक शिष्य घडविताना चांगले श्रोतेही निर्माण केले. तरुण गायकांना त्यानी प्रोत्साहन दिले. सिंधुदुर्गातील युवक कलाकारानी त्यांची स्मृती जागवली आहे. गुरु शिष्य परंपरेतून या गायकांची पुढील वाटचाल आश्वासक आहे अशी भावना अनेक मान्यवरानी व्यक्त केली.
कणकवलीतील संगीततज्ञ कै. निवृत्ती दाभोळे यांचा पाचवा स्मृती संगीत समारोह गंधर्व फाउंडेशन व दाभोळे शिष्य परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता.
आशिये येथील दत्त मंदिरात रविवारी संध्याकाळी झालेल्या या समारोहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा कलाकार पर्णा नायगावकर हिने कौसल्येचा राम, पारवी नायगावकर हिने खेळ मंडियेला, अनुष्का आपटे हिने कानडा राजा पंढरीचा, काव्या गौंडळकर हिने निर्गुणाचा संग, स्वरांगी गोगटे हीने भिमपलास राग , नाट्यपद, पद्मनाभा नारायणा पद सादर केले. वेदांत कुयेस्कर याने एकल तबला वादन केले. हर्ष नकाशे याने विविधांगी श्रवणीय गायन केले. संवादिनी वर संदीप पेंडूरकर , धनंजय प्रभुदेसाई यांनी तर तबला साथ वेदांत कुयेस्कर अरुण केळुसकर यांनी केली. सूत्रसंचलन संजय कात्रे यांनी केले. कुकारो साउंड ने उत्तम ध्वनीप्रक्षेपण केले.
यावेळी अध्यक्ष अभय खडपकर, बाळ नाडकर्णी , मुकुंद खानोलकर , गंधर्व फाउंडेशनचे मनोज मस्त्री, भूषण बुचडे, संतोष सुतार, संदीप पेंडूरकर किशोर सोगम, सागर महाडिक, संतोष कांबळे, डॉ मुक्तानंद गौंडळकर , दामोदर खानोलकर, धीरेश काणेकर, गिरीश सावंत, तसेच विश्रांती कोयंडे , गुरु पावसकर , संतोष वायगणकर, नारायण देसाई ,तेजस्विता पेंडुरकर, आदि मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page