बांदा/प्रतिनिधी
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर ५ या शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी रिद्धी रूपेश सावंत हिने ३०० पैकी २१४ गुण मिळवून जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ४३ वा क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले.
२ पैकी २ विद्यार्थी पात्र करून शाळेचा निकाल १०० टक्के लागला. तिला वर्गशिक्षक सुधीर राजाराम गावडे यांचे मार्गदर्शन तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर, पदवीधर शिक्षक विलास राऊळ, भास्कर माजगावकर, हंसराज गवळे यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष सिद्धी सावंत, प्राधिकरण सदस्य कृष्णा सावंत व सर्व सदस्य, पालक तसेच केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, बांदा प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.
