Headlines

सावंतवाडी-मळगाव घोडेमुख तिठा येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकावर कारवाई

बांदा राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई; 5 लाख 10 हजारचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.२७-: सावंतवाडी-मळगाव रोड घोडमुख तिठा मौजे ,पेंडूर येथे अवैधरित्या गोवा दारूची वाहतूक करताना इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाने स्विफ्ट कारवर कारवाई करत त्याच्याकडून 2 लाख 40 हजार किमतीच्या दारूसह दोन लाख 70 हजार किमतीची चार चाकी वाहन असे एकूण मिळून 5 लाख…

Read More

रेडी येथील अपंग निराधार दत्ताराम साळगावकर यांचा विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत…

वेगुर्लेरेडी गावातळेवाडी येथील अपंग आणी निराधार ग्रामस्थ दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांचा पत्नीस भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांची आर्थिक मदत केली. यावेळी रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे,प्रथमेश कामत, समाजिक कार्यकर्ते सागर राणे,दीपक राणे,आबा राणे उपस्थित होते. श्री दत्ताराम साळगावकर व पत्नीने श्री परब यांचे आभार व्यक्त केले.

Read More

कवयित्री योगिता शेटकर यांच्या काव्यसंग्रहाचे १७ रोजी प्रकाशन

⚡कणकवली ता.१४-: कवयित्री योगिता शेटकर यांच्या मुंबई येथील ग्लोबल बुक हाऊस प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘ ‘करुणेचा प्रवाह ‘ कव्यांग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार १७ सप्टेंबर रोजी स.१०.३० वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात कवी अजय कांडर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.तर…

Read More

कास शाळा नं 1च्या व्यवस्थापन अध्यक्षपदी निलेश राणे

⚡बांदा ता.१४-:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नंबर 1 च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश गोविंद राणे तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अर्जुन कासकर यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पालक शिक्षक बैठकीत समिती गठीत करण्यात आली.यावेळी सरपंच प्रविण पंडित, मुख्याध्यापक गोटस्कर, पालक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

कसाल येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

दोघांना घेतले ताब्यात: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ⚡ओरोस ता.१३-: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे पथकाने कसाल ओव्हर ब्रिजच्या खालीयेथे अवैध गोवा बनावट दारू वाहतुकीवर कारवाई करत तब्बल पाच लाख 52 हजार रुपयांची दारू व अकरा लाख रुपये किमतीची दोन वाहने यासह दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होत…

Read More

जान्हवी सावंत यांची “वक्ते”पदी नियुक्ती

⚡कुडाळ ता.१३-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सूचनेनुसार जान्हवी सावंत यांची “वक्ते”पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जान्हवी सावंत या सिंधुदुर्ग महिला आघाडी जिल्हा संघटक असून माजी जिल्हा परिषद सदस्या व गटनेत्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय “सडेतोड” वक्तृत्व…

Read More

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम…

सौ. आदिती मेस्त्री यांच्या पाककृतीची तालुकास्तरावर निवड ⚡मालवण ता.१३-: प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत प्राथमिक शाळा देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे आप्पे” या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मसुरे केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी,…

Read More

वाफोली आडे नं २ शाळेत वृक्षारोपण

बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जिल्हा परिषद केंद्रशाळा वाफोली आडे नं २ येथे आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिकू, जाम यासारखी फळझाडे व जास्वंद, मोगरा व इतर फुलझाडे लावण्यात आली. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. मुलांना वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी…

Read More

इन्सुली नं ५ शाळेत रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न

बांदा/प्रतिनिधीजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्सुली उपसरपंच कृष्णा शिवाजी सावंत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नमिता विवेकानंद नाईक, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सिद्धी सावंत,…

Read More

आयुष्यमान भारत योजना नागरिकांसाठी लाभदायी…

जिल्हाधिकारी किशोर तावडे:जिल्ह्यात योजनेचा झाला शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता १३केंद्र शासनाची आयुष्यमान भव ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय लाभदायी अशी आहे. या योजनेचा शुभारंभ आज जिल्ह्यात झाला असून या योजनेअंतर्गत आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आजच्या शुभारंभ कार्यक्रमात केले. केंद्र शासनाची…

Read More
You cannot copy content of this page