जान्हवी सावंत यांची “वक्ते”पदी नियुक्ती

⚡कुडाळ ता.१३-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सूचनेनुसार जान्हवी सावंत यांची “वक्ते”पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जान्हवी सावंत या सिंधुदुर्ग महिला आघाडी जिल्हा संघटक असून माजी जिल्हा परिषद सदस्या व गटनेत्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय “सडेतोड” वक्तृत्व स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या होत्या.
अभ्यासू व रोखठोक व निर्भीडपणे आपली व पक्षाची भूमिका मांडण्याची त्याची ख्याती आहे.
कोणतीही निवडणूक असो पक्षाची व उमेदवाराची भूमिका त्यांनी आजपर्यंत सडेतोडपणे मांडली. शिवसेना महिला आघाडी तळागाळापर्यंत भक्कम करण्यासाठी त्यांनी परिश्रम केले आहेत.

You cannot copy content of this page