बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जिल्हा परिषद केंद्रशाळा वाफोली आडे नं २ येथे आज वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी चिकू, जाम यासारखी फळझाडे व जास्वंद, मोगरा व इतर फुलझाडे लावण्यात आली. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. मुलांना वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी सांगितले. यावेळी मुलांना वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार शिवम गावडे, विनिता कुबडे, ईश्वरी कल्याणकर, शंकर कोकाटे, संकेत वेंगुर्लेकर तसेच वाफोली शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो :-
वाफोली येथे वृक्षारोपण करताना विद्यार्थी, शिक्षक व पालक.
