इन्सुली नं ५ शाळेत रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न

बांदा/प्रतिनिधी
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्सुली उपसरपंच कृष्णा शिवाजी सावंत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नमिता विवेकानंद नाईक, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सिद्धी सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी पी. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रीती आरोसकर व निरवडे कृषी सहाय्यक पी. पी. सावंत, कृषी सहाय्यक इन्सुली श्रीमती घाडी, मुख्याध्यापक धनंजय केरकर, पदवीधर शिक्षक भास्कर माजगावकर, सुधीर गावडे व श्री. हंसराज गवळे तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती परब तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीम. राजश्री कोठावळे व सर्व विद्यार्थी, महिला भगिनी बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते. तृणधान्ये, विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच पाककृती स्पर्धेमध्ये १९ पालकांनी सहभाग घेतला.
पाककृती स्पर्धा विजेते:- दिप्ती दिपेश सावंत- (प्रथम), सिद्धी सहदेव सावंत- (द्वितीय), आरती विवेक सावंत- (तृतीय).
सदर स्पर्धेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेकानंद नाईक यांनी बक्षीसे पुरस्कृत केली होती.
फोटो :-
इन्सुली नंबर ५ शाळेत रानभाज्या प्रदर्शन व स्पर्धेसाठी उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page