Headlines

नांदगाव येथे गणेश उत्सव काळात वाहतूक कोंडी टाळणार

गणेश उत्सव काळात बाजारात दुचाकी व इतर वाहनांना नो पार्किंग ⚡कणकवली ता.१५-:गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण नियोजन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी,आठवडा बाजार याबाबत कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा करून तसेच बाजारात जात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करुन संपूर्ण सहकार्य नांदगाव ग्रामपंचायत तसेच…

Read More

बँकांमधील खात्यांमधून निवृत्ती वेतन एकाच दिवशी पूर्वीप्रमाणे जमा करणार

सुरेश पेडणेकर व सुधाकर देवस्थळी यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१५-: बँकांमधील खात्यांमधून निवृत्ती वेतन एकाच दिवशी पूर्वीप्रमाणे जमा केले जाईल याबाबत संबंधित बँक शाखेला योग्य ते आदेश / सूचना करण्याबाबत विनंती करण्यात आली. गट विकास अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित शाखेला योग्य त्या सूचना देण्याचे मान्य केले अशी माहिती प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात सुरेश…

Read More

विज्ञान नाट्योत्सवात एस.एम. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची चमक

⚡कणकवली ता.१५-: नेहरू विज्ञान केंद्र वरळी (मुंबई) आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळरे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2023-24 मध्ये एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘भरडधान्य काळाची गरज’ ही नाटिका सादर करून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.या नाटिकेमध्ये आर्या कदम, भूषण बाणे,…

Read More

अनधिकृत कॉरी क्रशर वाल्यांकडून शासनाचे नियम डावलून मोठ्या प्रमाणावर अवैध दगड उत्कखनन सुरु…

परशुराम उपरकर: कॉरी मालकावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याची प्रांत अधिकाऱ्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत कॉरी क्रशर वाल्यांकडून बेकायदा शासनाचे नियम डावलून मोठ्या प्रमाणावर अवैध दगड उत्कखनन सुरु असून अशा कॉरी क्रेशर वाल्यांवर योग्य ती कारवाई केली जावी तसेच मालकीच्या जमिनीत गैरकायदा ब्लास्टिंग करून दगड उतखनन करणाऱ्या संबंधित मालकाला 49 लाख रुपयांचा…

Read More

सावंतवाडीत रविवारी लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी

⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रिताच्या साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १४ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट संघ निवड चाचणी रविवारी 17 सप्टेंबर ला भटवाडी येथील वि. स. खांडेकर मैदानावर सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २००९ नंतर जन्मलेला व जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार आहे.भाग घेऊ इच्छित खेळाडूंनी…

Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी पालघरचे डेप्युटी इंजिनियर श्री.महेंद्र किणी यांची नियुक्ती..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून दिल्या शुभेच्छा.. सावंतवाडी:-सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका चव्हाण यांची काही दिवसां पुर्वी रत्नागिरी येथील महाप्रकल्प विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते.आता या रिक्त असलेल्या सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री.महेंद्र किणी…

Read More

आरोसमध्ये गणेशोत्सवापूर्वी बीएसएनएल सेवा सुधारा

सरपंच शंकर नाईक ; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ⚡बांदा ता.१५-: ऐनन गणेशोत्सवा दरम्यान आरोस गावातील बीएसएनएल सेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. नेटवर्कच्या समस्याने गावातील नागरी हैराण झाले आहेत. गेले पंधरा दिवस सुरळीत नेटवर्क अभावी गावातील विद्यार्थी, नोकरदार, ऑनलाईन काम करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. गणेशोत्सवापूर्वी बीएसएनएल सेवा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आरोद सरपंच…

Read More

केणीवाडा अंतर्गत रस्त्याची श्रमदानातून सफाई

⚡बांदा ता.१५-: पाडलोस केणीवाडा राम मंदिर मार्गे अंतर्गत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा झाडीचे साम्राज्य वाढले होते. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून सदर झुडपांची सफाई करून रस्ता वाहतुकीस निर्धोक केला. केणीवाडा अंतर्गत मार्गावरील झुडपे तसेच विद्युत वाहिन्यांना लागणाऱ्या फांद्या श्रमदानातून तोडण्यात येतात. गणेश चतुर्थी पूर्वी वाडीतील ग्रामस्थ एकवटले व रस्त्यावर आलेली झुडपांची सफाई केली. त्यामुळे आता समोरून…

Read More

‘ग्लोबल महाराष्ट्र’ चॅनेलचा आरती संग्रह दर्जेदार…

भाजपा नेते तथा उद्योजक विशाल परब यांचे गौरवोद्गार; भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती संग्रहाचे प्रकाशन.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पावधीतच प्रत्येक जनतेच्या मनामनात स्थान निर्माण केलेल्या “ग्लोबल महाराष्ट्र” न्यूज चॅलन कडून गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेला ‘आरती संग्रह’ हा दर्जेदार असून निश्चितच तो वाचकांच्या पंसतीत उतरेल असे गौरवोद्गार भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब…

Read More

पैशांची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला स्थानिकांनी पकडले…

दुपारची घटना:पोलिसांच्या दिले ताब्यात… ⚡बांदा ता.१५-: बांदा कट्टा कॉर्नर बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत दुकानातील पैशांची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. कट्टा कॉर्नर येथील दुकानात गर्दीचा फायदा घेत हा चोरटा शिरला. तेथे गल्ल्यावर असलेली पैशांची पिशवी त्याने हातचालखी करत लांबविली. दुकानदाराच्या ही बाबा…

Read More
You cannot copy content of this page