सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी पालघरचे डेप्युटी इंजिनियर श्री.महेंद्र किणी यांची नियुक्ती..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून दिल्या शुभेच्छा..

सावंतवाडी:-सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका चव्हाण यांची काही दिवसां पुर्वी रत्नागिरी येथील महाप्रकल्प विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते.आता या रिक्त असलेल्या सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री.महेंद्र किणी यांची नियुक्ती झाली आहे.त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.

कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक व पत्रकार श्री.आबा खवणेकर व ग्लोबल महाराष्ट्र या न्यूज चॅनचे संपादक तसेच पत्रकार श्री.प्रसन्न गोंदावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनिर्वाचित कार्यकारी अभियंता श्री.महेंद्र किणी साहेब यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

You cannot copy content of this page