⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रिताच्या साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १४ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट संघ निवड चाचणी रविवारी 17 सप्टेंबर ला भटवाडी येथील वि. स. खांडेकर मैदानावर सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २००९ नंतर जन्मलेला व जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार आहे.
भाग घेऊ इच्छित खेळाडूंनी खेळाडूंनी पूर्ण गणवेशात उपस्थित राहून जन्मदाखला, आधारकार्ड व प्रवेश फी २०० रुपये सोबत घेऊन येणे गरजेची आहे.
याबाबत चे आवाहन जिल्हा सहसचिव काशिनाथ दुभाषी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नंदू रेडकर (९४०३५५९८८४) व रघु धारणकर (९८९०८०२०९५) संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.
सावंतवाडीत रविवारी लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी
