⚡कणकवली ता.१५-: नेहरू विज्ञान केंद्र वरळी (मुंबई) आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळरे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2023-24 मध्ये एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘भरडधान्य काळाची गरज’ ही नाटिका सादर करून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
या नाटिकेमध्ये आर्या कदम, भूषण बाणे, आमोद बाक्रे, भावना निग्रे, प्रणिता शेलार, वलय आचरेकर, अनामय खांडेकर व संध्या गोधळकर या विद्यार्थ्यांनी आपली अभिनय कला उत्तम प्रकारे सादर केले.
या नाटिकेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. तावडे , हिर्लेकर व गुरव या सर्वांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष डॉ. एस. एन.तायशेटे, सचिव डी. एम.नलावडे, उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके तसेच उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .
