भाजपा नेते तथा उद्योजक विशाल परब यांचे गौरवोद्गार; भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती संग्रहाचे प्रकाशन..
⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पावधीतच प्रत्येक जनतेच्या मनामनात स्थान निर्माण केलेल्या “ग्लोबल महाराष्ट्र” न्यूज चॅलन कडून गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेला ‘आरती संग्रह’ हा दर्जेदार असून निश्चितच तो वाचकांच्या पंसतीत उतरेल असे गौरवोद्गार भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केले. श्री परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘ग्लोबल महाराष्ट्र’ चॅनलच्या आरती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
श्री परब म्हणाले, ग्लोबल महाराष्ट्र चॅनल अल्पावधीतच सिंधुदुर्ग मध्ये आपले नावलौकिक केले आहे समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम चॅनलच्या माध्यमातून होत असून चांगल्या वाईट गोष्ट क्षणार्धात जनतेपर्यंत पोहचविण्यात ग्लोबल महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहीला आहे. निमित्त वाचकांसाठी प्रकाशित केलेले आरती संग्रह सुद्धा दर्जेदार असून तो नक्कीच वाचकांना आवडेल. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, तेजस माने, साईप्रसाद भोई, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.
