⚡बांदा ता.१५-: पाडलोस केणीवाडा राम मंदिर मार्गे अंतर्गत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा झाडीचे साम्राज्य वाढले होते. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून सदर झुडपांची सफाई करून रस्ता वाहतुकीस निर्धोक केला.
केणीवाडा अंतर्गत मार्गावरील झुडपे तसेच विद्युत वाहिन्यांना लागणाऱ्या फांद्या श्रमदानातून तोडण्यात येतात. गणेश चतुर्थी पूर्वी वाडीतील ग्रामस्थ एकवटले व रस्त्यावर आलेली झुडपांची सफाई केली. त्यामुळे आता समोरून येणारे वाहन स्पष्ट दृष्टीस पडणार असल्याने अपघातही टळणार आहेत. यावेळी वाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असे अमोल नाईक यांनी सांगितले.
