दुपारची घटना:पोलिसांच्या दिले ताब्यात…
⚡बांदा ता.१५-: बांदा कट्टा कॉर्नर बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत दुकानातील पैशांची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. कट्टा कॉर्नर येथील दुकानात गर्दीचा फायदा घेत हा चोरटा शिरला. तेथे गल्ल्यावर असलेली पैशांची पिशवी त्याने हातचालखी करत लांबविली. दुकानदाराच्या ही बाबा लक्षात येताच त्याने तेथून बस स्थानकाच्या दिशेने पलायन केले. तोपर्यंत स्थानिकांनी चोरट्याचा पाठलाग केला. शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान, हेमंत दाभोलकर व युवकांनी त्याला रुक्मिणी सुपर बाजारच्या नजिक पकडले. त्याला चोप दिल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. याची कल्पना बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले. यावेळी स्थानिकांनी गर्दी केली होती.
