Headlines

आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’…

विशाल परब: भव्य ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२१-: क्रीडा क्षेत्रातील अशा स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास उंचावतो. आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचं भारी वेड. आपल्याकडे क्रिकेट नुसता पाहिला जात नाही तर त्याहूनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. क्रिकेटमधून आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या घडतो, तसेच…

Read More

करूळ येथे भरदिवसा घर फोडी…

पोलिसांची घटनास्थळी धाव:२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास.. ⚡कणकवली ता.२०-: करुळ येथील घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन हजार रोख रक्कम असे मिळून दोन लाख ८१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी ११ते २ वा. च्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी ११ वा. च्या. सुमारास घर मालक हे काही कामानिमित्त घराबाहेर…

Read More

ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे वार्षिक अधिवेशन २२ मार्चला…

⚡सावंतवाडी ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, पोस्ट, बि. एस्. एनएल्. रेल्वे, आयकर, सेनादल, ब्यूरो आॅफ माईन्स,, शिपिंग, आकाशवाणी, दुरचित्रवाणी, सेंट्रल पोलीस फोर्स, भाभा अॅटोमिक रिसर्च, सेंट्रल एक्साईज आदी केंद्र सरकारच्या खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक अधिवेशन शुक्रवार दिनांक २२मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी एच. एफ….

Read More

खडपडे येथील पट्टेरी वाघाच्या अस्तित्वामुळे इकोसेन्सेटिक झोन याचिकेला भक्कम पुरावा..

स्टॅलिन दयानंद ; अखेर वनविभागाला वाघाचे अस्तित्व मान्य करावे लागले.. ⚡सावंतवाडी ता.२०-: राष्ट्रीय संशोधन अनुसज्ञान संस्था देहराडून यांच्या सर्वेक्षणानुसार मांगेली ते सह्याद्री पट्ट्यातील राधा नगरी अभयारण्य पर्यंत बावीस पट्टेरी वाघांचे अस्तित्व आढळले होते परंतु वन विभाग हे अस्तित्व नाकारत होता मात्र दोडामार्ग तालुक्यात खडपडे येथे आढळलेल्या पट्टेरी वाघामुळे वन विभाग उघडा पडला आहे. वनविभागाला त्यामुळे…

Read More

महायुतीचा जो उमेदवार देणार त्याचा सर्व शिवसेना पदाधिकारी एकमताने काम करतील…

सचिन वालवालकर:किनारपट्टी भागासाठी शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काशिनाथ नार्वेकर यांची नियुक्ती.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचाच उमेदवार असावा असा आग्रह आपला पक्षश्रेष्ठींकडे आहे. महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार देण्यात येईल त्याचा सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते एकमताने काम करतील असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला. दरम्यान यावेळी…

Read More

उत्सव समिती अध्यक्षपदी विठ्ठल जाधव…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला-आनंदवाडी येथील डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एप्रिल महिन्यात होणा-या डॉ.आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी विठ्ठल जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. फोटो – विठ्ठल जाधव

Read More

जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे घवघवीत यश…

⚡मालवण ता २०-: महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत शालेय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयानेघवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने गट क्रमांक चार मधून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत…

Read More

मेढा येथे कासवाच्या पिल्लांना सोडले समुद्रात…

⚡मालवण ता.२०-: मालवण मेढा येथील समुद्र किनारी ऑलीव्ह रीडले कासवाच्या संरक्षित करून ठेवलेल्या अंड्यांमधून आज पिल्ले बाहेर आल्यावर या पिल्लांना कासव मित्र कीर्तिदा तारी व करण कुबल व यांच्यासह सहकाऱ्यांनी समुद्रात सोडले. यावेळी ६५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. मालवण मेढा येथील कीर्तिदा तारी यांच्या घरानजीकच्या समुद्र किनाऱ्यावर दि. ३१ जानेवारी रोजी ऑलीव्ह रीडले कासवाने अंडी…

Read More

जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.२०-:मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी जिम्नॅस्टिक या खेळाबद्दल माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्याच्या हेतूने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक सुहास लोहार यांचे प्रशिक्षण शिबिर जय गणेश इंग्लिश स्कुल मध्ये संपन्न झाले. मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.शरद परुळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने मुले आणि मुली त्यांच्या…

Read More

महिलांनी कायदा व संविधान समजून घेणे आवश्यक…

ऍड. देवदत्त परुळेकर:सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समारोप. ⚡मालवण ता.२०-: कायद्याचा आपल्याला वेळोवेळी वापर करावा लागतो, त्यामुळे तो समजून घेणे गरजेचे आहे. तसेच जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतात महिलांना लगेच मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे संविधानही समजून घेणे आवश्यक आहे, असे मत बॅ….

Read More
You cannot copy content of this page