Headlines

जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.२०-:
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी जिम्नॅस्टिक या खेळाबद्दल माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्याच्या हेतूने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक सुहास लोहार यांचे प्रशिक्षण शिबिर जय गणेश इंग्लिश स्कुल मध्ये संपन्न झाले. मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.शरद परुळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने मुले आणि मुली त्यांच्या पालकांसहीत सहभाग झाले होते.

यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटी तर्फे श्री. सुहास लोहार, श्री. चौरसिया व प्रमुख पाहुणे रुझरिओ पिंटो यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहायक शिक्षक निशिकांत पराडकर यांनी प्रास्ताविक करत शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रशिक्षक सुहास लोहार यांनी जिमनॅस्टिक या खेळाची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक सत्यम चौरसिया याने जिमनॅस्टिकची विविध प्रात्यक्षिके स्वतः सादर केली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी श्री.लोहार व सत्यम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची प्रात्यक्षिके अप्रतिमपणे सादर केली.

या प्रशिक्षणाचा मालवण एज्युकेशन सोसायटीच्या शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खानोलकर प्रशालेच्या मुख्याधिपीका सौ. तेजल वेंगुर्लेकर, ज्येष्ठ खेळाडू रुजारिओ पिंटो, जयंत गवंडे, डॉ. वालावलकर, रेनॉल्ड बुतेलो, विलास परुळेकर, आप्पा मालंडकर, चंदू साळवी तसेच मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन,मालवण स्पोर्टस असोसिएशन,मालवण स्पोर्टस क्लबचे सभासद आणि बहुसंख्येने विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन निशिकांत पराडकर यांनी केले.

You cannot copy content of this page