आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’…

विशाल परब: भव्य ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२१-: क्रीडा क्षेत्रातील अशा स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास उंचावतो. आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचं भारी वेड. आपल्याकडे क्रिकेट नुसता पाहिला जात नाही तर त्याहूनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. क्रिकेटमधून आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या घडतो, तसेच संघभावना ही वाढीस लागते. क्रिकेटच्या मैदानातून उत्तम खेळाडू घडावेत,असे प्रतिपादन भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे केले.

येथील श्री सिध्देश्वर, पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ ‘भव्य ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा’ २१ ते २४ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी तळवडे बाजारपेठ मैदान येथे उपस्थित राहून उद्घाटन केले. यावेळी श्री परब यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page