विशाल परब यांची घटनास्थळी भेट ; कृष्णाजी रेडकर यांना दिला धीर..
⚡सावंतवाडी ता.२१-: काल मध्यरात्री दोनच्या सुमारास माजी सरपंच तळवडे श्री.कृष्णाजी पांडुरंग रेडकर यांच्या घरासमोरील शेडला अचानक आग लागली. काही किरकोळ नुकसान झाले होते. तळवडे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या युवा उद्योजक विशाल परब यांनी ही घटना समजताच घटनास्थळी भेट देत त्यांचे सांत्वन केले.
विशेष बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रसंगी त्यांना आधार देत आपुलकीच्या संवाद साधला.
