१९ लाखाचा मुद्देमाल जप्त :तपासणी नाक्यावर पोलिसांची कारवाई..
⚡बांदा,ता.२१-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. मोर्ला रवी चिट्ठी बाबू रवी व गुडीपुडी सुबराव साई कुमार (रा. पट्टी,आंध्र प्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
