करूळ येथे भरदिवसा घर फोडी…

पोलिसांची घटनास्थळी धाव:२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास..

⚡कणकवली ता.२०-: करुळ येथील घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन हजार रोख रक्कम असे मिळून दोन लाख ८१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी ११ते २ वा. च्या सुमारास घडली.

बुधवारी सकाळी ११ वा. च्या. सुमारास घर मालक हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी २ वा. च्या सुमारास ते घरी आले तेव्हा सदरचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी घरी पाहिले असता घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाटातील असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. तर घरमालकाने याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

You cannot copy content of this page