खडपडे येथील पट्टेरी वाघाच्या अस्तित्वामुळे इकोसेन्सेटिक झोन याचिकेला भक्कम पुरावा..

स्टॅलिन दयानंद ; अखेर वनविभागाला वाघाचे अस्तित्व मान्य करावे लागले..

⚡सावंतवाडी ता.२०-: राष्ट्रीय संशोधन अनुसज्ञान संस्था देहराडून यांच्या सर्वेक्षणानुसार मांगेली ते सह्याद्री पट्ट्यातील राधा नगरी अभयारण्य पर्यंत बावीस पट्टेरी वाघांचे अस्तित्व आढळले होते परंतु वन विभाग हे अस्तित्व नाकारत होता मात्र दोडामार्ग तालुक्यात खडपडे येथे आढळलेल्या पट्टेरी वाघामुळे वन विभाग उघडा पडला आहे. वनविभागाला त्यामुळे तिलारी ते आंबोली पर्यंतच्या पट्ट्यात सहा वाघ अस्तित्वात असल्याचे मान्य करावे लागले यामुळे हा भाग इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करावा यासाठी उच्च न्यायालयात वनशक्तीने दाखल केलेल्या याचिकेला भक्कम पुरावा मिळाला आहे असा दावा वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 2013 ला दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी लागू केली असताना आतापर्यंत तेराशे एकर जमिनीत वृक्षतोड झाली आहे जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक याला जबाबदार आहेत त्यामुळे त्याच्यावर त्याचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page