Headlines

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची चिपी विमानतळ येथे नागरी उड्डयन सुरक्षा अधिकारी म्हणून बदली

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची चिपी विमानतळ येथे नागरी उड्डयन सुरक्षा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कमलेश बच्छाव यांची कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तेजस नलावडे यांनी कणकवली येथे कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच विविध संवेदनशील प्रकरणांचा प्रभावीपणे निपटारा करत आपला ठसा उमटविला. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या पोलीस कारवाया राबविण्यात आल्या.

दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव लवकरच कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या बदल्यांचे आदेश पोलीस विभागाकडून जारी करण्यात आले असून, कणकवलीसह जिल्ह्यात या प्रशासकीय बदलाची चर्चा सुरू आहे.

You cannot copy content of this page