Headlines

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह स्वीकारणार निवेदने

कणकवली : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या समवेत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, कणकवली येथे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान यावेळी नागरिकांनी आपल्या विविध शासकीय कामांशी संबंधित मागण्यांची लेखी निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ लेखी निवेदने स्वीकारली जाणार असून कोणत्याही प्रकारचा सत्कार करण्यात येणार नाही. त्यामुळे हार, पुष्पगुच्छ अथवा इतर सत्कार साहित्य घेऊन येऊ नये, असेही जाहीर करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page