उत्सव समिती अध्यक्षपदी विठ्ठल जाधव…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला-आनंदवाडी येथील डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एप्रिल महिन्यात होणा-या डॉ.आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी विठ्ठल जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.

     उर्वरित कार्यकारिणीत गजानन जाधव व मोनाली जाधव (उपाध्यक्ष),  अमोल जाधव (सचिव), प्रेमानंद जाधव (सहसचिव), जयंत जाधव (खजिनदार), सखाराम जाधव व विकास जाधव (सहखजिनदार), लाडू जाधव व सुप्रिया जाधव (कार्याध्यक्ष), वामन कांबळे, सुरेश जाधव व विणा जाधव (सल्लागार) यांचा समावेश आहे. यावेळी सिधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई-वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित समाजसेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्ष सुहानी जाधव तसेच आनंदवाडीतील धम्म बांधवभगिनी उपस्थित होते. या बैठकीत डॉ.आंबेडकर जयंतीची रूपरेषा ठरविण्यात आली.

फोटो – विठ्ठल जाधव

You cannot copy content of this page