Headlines

आडाळी एमआयडीसीत आणखी एका मोठ्या उद्योगाची भर…

ऑटोमेज कंपनीची २५० कोटींची गुंतवणूक; ५०० हून अधिक रोजगारनिर्मिती होणार; आमदार दीपक केसरकर.. ⚡सावंतवाडी, ता.०१-: दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळणार असून, येथे ऑटोमेज कंपनीच्या माध्यमातून तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नवीन उद्योग साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ५०० हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार दीपक…

Read More

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेचे नियोजन

रस्ते, विसर्जन स्थळे, पार्किंग व स्वच्छतेबाबत प्रशासनाची तयारी मालवण (प्रतिनिधी) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भाविकांना आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय भासू नये, यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने विविध सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजित नियोजन बैठकीत शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विसर्जन स्थळांची व्यवस्था, पार्किंग नियोजन आणि अग्निशामक दलाची तत्परता यांसारख्या विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले….

Read More

गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी मतदारसंघाला १५ नव्या एसटी बस…

आम. दीपक केसरकर: सावंतवाडी बसस्थानकाच्या आराखड्यात बदलांच्या सूचना; तिन्ही आगारांसाठी मिनीबस देण्यास तत्त्वतः मंजुरी.. ⚡सावंतवाडी, ता.०१-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एसटी महामंडळाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत आज मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यांतील एसटी सेवेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली….

Read More

काजू नुकसानभरपाईपासून तांबोळीतील शेतकरी वंचित

गणेश चतुर्थीपर्यंत रक्कम न मिळाल्यास कृषी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा बांदा/सकाळ वृत्तसेवातांबोळी गावातील अनेक शेतकऱ्यांना काजू पिकाच्या नुकसानीपोटी मंजूर झालेली नुकसानभरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गणेश चतुर्थीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा तांबोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई यांनी दिला…

Read More

‘पोलीस दूत’ विद्यार्थ्यांनी दिले सुरक्षिततेचे धडे…

श्री देवी माऊली विद्यालयात जनजागृती.. ⚡कुडाळ ता.०१-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे बालसुरक्षा, POCSO कायदा, बालहक्क, सायबर गुन्हे आणि रस्ता सुरक्षा या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना बालहक्क, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सुरक्षित वर्तन, ऑनलाइन सुरक्षितता, वैयक्तिक…

Read More

जिव्हाळा सेवाश्रमात रक्षाबंधनाचा आनंदोत्सव…

प्रेमाच्या धाग्याने जुळले माणुसकीचे बंध.. ⚡कुडाळ ता.०१-: श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सेवाश्रमातील लाभार्थींनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रेम, माया, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे सेवाश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबापासून दूर असलेल्या लाभार्थींना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम आणि…

Read More

कुडाळ ते भोसले कॉलेज चरटा थेट एस.टी. बस सेवा सुरू करा…

नगरसेवक अभिषेक गावडे यांची आगार व्यवस्थापकांकडे मागणी.. ⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील विद्यार्थ्यांना भोसले कॉलेज, चरटा (सावंतवाडी) येथे जाण्यासाठी थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक तथा शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.सध्या कुडाळ, पिंगुळी, ओरोस, कळसुली, आंबरड आदी भागातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थी यशवंतराव भोसले कॉलेज…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ६७ लिपिक पदांची भरती सुरू…

३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज; जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ७० टक्के पदांना प्राधान्य सिंधुदुर्गनगरी, ता. १ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरतीसाठी गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात…

Read More

एनसीएमसी कार्ड सक्तीवरून बांद्यात संताप…

बुधवारी एसटी वाहतूक रोखण्याचा इशारा.. ⚡बांदा ता.०१-:एनसीएमसी कार्ड सक्तीच्या प्रश्नावरून बांद्यात संतापाचा उद्रेक झाला असून, कार्ड वितरणाची अपुरी व्यवस्था असताना सक्तीची अंमलबजावणी कशासाठी, असा सवाल करत बांदा मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांदा बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी प्रवास सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले असले…

Read More

ग्रामसभेतील असुरक्षिततेविरोधात ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १-:ग्रामसभा ही ग्रामीण लोकशाहीची महत्त्वपूर्ण व्यवस्था असली तरी ग्रामसभा आयोजित करताना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्माण होणाऱ्या असुरक्षितेच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद मुख्य इमारत ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला.या मूक मोर्चात मोठ्या संख्येने जिल्हा परिषद अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page