Headlines

सिद्धेश परब याचे ऍथलेटिक्समध्ये सुयश

मालवण (प्रतिनिधी)

फोंडाघाट येथे श्री. संजय आंग्रे मित्रमंडळ, फोंडाघाट आयोजित जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्स स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धेश सुरेश परब याने २०० मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला.

सिद्धेश परब हा हा द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत असून तो मसुरे या गावचा रहिवासी आहे. त्याने या आगोदरही विद्यापीठ स्तरावर देखील विविध मैदानी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. त्याला जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्राचार्य प्रा. के. के. राबते यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, प्राचार्य श्री. राबते, सर्व संस्था सदस्य प्राध्यापक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page