मालवण (प्रतिनिधी)
लायन्स क्लब मालवणच्या वतीने शिक्षक दिन साजरा करताना रेकोबा हायस्कूल, वायरी येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी हायस्कूल व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभूलकर, जयश्री हडकर, राजा शंकरदास, शांती पटेल, मिताली मोंडकर, उमेश शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक संजय खोचरे, यांसह शिक्षक श्री. फणसेकर, श्री. कोरे, श्री. कुबल, सौ. मिताली मोंडकर, सौ. रोहिणी दिघे, सौ. अदिती शेर्लेकर, श्री. डगरे, यांसह दत्ता गोसावी, यशवंत गांवकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लायन्स क्लब च्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी हायस्कूल व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
