Headlines

जिव्हाळा सेवाश्रमात रक्षाबंधनाचा आनंदोत्सव…

प्रेमाच्या धाग्याने जुळले माणुसकीचे बंध..

⚡कुडाळ ता.०१-: श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सेवाश्रमातील लाभार्थींनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रेम, माया, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे सेवाश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबापासून दूर असलेल्या लाभार्थींना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम आणि आपुलकीचा आधार मिळावा, या भावनेतून रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गितांजली बिर्जे, अरुण परब, जयप्रकाश प्रभू, प्राजक्ता केळुसकर यांच्यासह सेवाश्रमातील लाभार्थी उपस्थित होते.
राखीच्या प्रेमळ धाग्याने एकमेकांशी आपुलकीचे नाते जोडत या सोहळ्यातून माणुसकी, जिव्हाळा आणि परस्पर स्नेहाचा सुंदर संदेश देण्यात आला.

You cannot copy content of this page