Headlines

अशोक गोरुले यांचे निधन…

⚡कणकवली ता.२९-: वागदे-टेंबवाडी येथील अशोक लक्ष्मण गोरुले (५७) यांचे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची खबर संतोष नारायण गोरुले यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अशोक गोरुले यांचे २५ एप्रिल रोजी हर्नियाचे ऑपरेशन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झाले होते. त्यामुळे त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयातच अॅडमिट करून २७ एप्रिलला घरी पाठवण्यात आले. त्यादरम्यान…

Read More

राणेंच्या प्रचारार्थ अबीद नाईक यांची हुंबरटमध्ये बैठक…

⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी हुंबरट गावात बैठक घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणेंना निवडून द्यावे, असे आवाहन नाईक यांनी मतदारांना केले. बैठकीला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, कणकवली शहर राष्ट्रवादी अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले,…

Read More

विजय मांडवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२९-: वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 येथील शिवसेना उबाठा गटाचे शिवसैनिक तथा ग्रा. पं. सदस्य विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी अामदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.पक्षप्रवेशाच्यावेळी दिलीप रावराणे, बंटी रावराणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. उबाठा गटाकडून कोणते विकासकामे होत नसल्याने नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले….

Read More

शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२९-: फोंडा विभागातील येथील शिवसेनेचे उबाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय लाड, यश लाड, दत्तगुरु गुरव, भाऊ लाड यांनी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेक्षकर्त्यांचे राणेंनी स्वागत केले. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय…

Read More

कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या मूळपुरुष स्थानाचा ३ रोजी वार्षिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.२९-: कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानाचा वार्षिक उत्सव दि. ३ मे रोजी साजरा होणार आहे. कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानावर गतवर्षी छोटेखानी मंदिराची उभारणी करण्यात आली होती. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यास…

Read More

मुंबई गुजरातला पळवून नेण्याचा मोदी शहाचा डाव…

विनायक राऊत, जोपर्यंत शिवसैनिक सोबत तोपर्यंत हे शक्य नाही.. ⚡सावंतवाडी ता.२८-:महाराष्ट्राची अस्मिता असलेली मराठी माणसाची मुंबई गुजरातला पळवून येण्याचा डाव मोदी आणि शहा कंपनीचा आहे,मात्र जोपर्यंत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत तोपर्यंत हा त्यांचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मांडखोल येथे व्यक्त केला.माडखोल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत…

Read More

कणकवलीत 3 मे रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती ः राणेंच्या पराभवाची हॅट्रिक होणार.. ⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 6 कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला कणकवली विधानसभा…

Read More

लोरे गावात राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या लोरे गावातील प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव गांगोचाळा मंदिर येथे केला. लोके गावातून राणेंना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी केला. यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, कृषि उत्पन्न बाजारसमिती सभापती तुळशीदास रावराणे, लोरे-घोणसरी शक्ती केंद्र प्रमुख नरेश गुरव, लोरे सरपंच…

Read More

राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे कुंभवडेत आवाहन.. ⚡दोडामार्ग ता.२९-:महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कुंभवडे येथे केले.मंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ तेरवण येथून केला.यावेळी त्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.ते केवळ मातोश्रीवर बसून पक्ष चालवू…

Read More

नारायण राणे यांच्या प्रचारार्थसावंतवाडी शहरातील युवासैनिक उतरले मैदानात…

बाजारपेठेतील साईबाबा मंदिर येथे प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२९:-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरातील युवासैनिक मैदानात उतरले. बाजारपेठेतील साईबाबा मंदिर येथे सोमवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहरप्रमुख बाबु कुडतरकर म्हणाले, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More
You cannot copy content of this page