राणेंच्या प्रचारार्थ अबीद नाईक यांची हुंबरटमध्ये बैठक…

⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी हुंबरट गावात बैठक घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणेंना निवडून द्यावे, असे आवाहन नाईक यांनी मतदारांना केले. बैठकीला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, कणकवली शहर राष्ट्रवादी अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत, हुंबरटचे माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page